Posts

१५ जून... शाळेत गेलेल्या प्रत्येकासाठी...❤️

'कुछ बाते हमारे दिल के कमरे की इतनी खिडकिया खोल देती है की हम दंग रह जाते है'... खरं आहे, आपल्या आयुष्यात काही गोष्टी, प्रसंग यांसोबतच अशा काही विशेष तारखा असतात, ज्या मनावर कायमच्या कोरल्या गेलेल्या असतात.. दरवर्षी ती तारीख आली रे आली, की आपण कितीही व्यस्त असलो, तरी त्या तारखेशी निगडीत जुन्या आठवणींमध्ये रमून जातो... या तारखा प्रत्येकासाठी वेगवेगळ्या असतीलही, पण एक तारीख अशी आहे जी आठवली रे आठवली, की शाळेत गेलेला प्रत्येकजण जून्या आठवणींमध्ये हरवून जातो, आणि ही तारीख म्हणजे १५ जून....  १५ जून म्हटलं, की आठवते ती मे महिन्याची सुटी संपून सुरु झालेलं नवं शैक्षणिक वर्ष... नव्या इयत्तेचा पहिला दिवस... सगळ्या गोष्टी नवीन... नेमकं शाळेत जायच्या वेळेला पडलेला पाऊस... दरवळणारा मातीचा सुगंध... पाऊस असूनही खूप दिवसांनी शाळेत जाण्याचा उत्साह... प्रत्येक १५ जूनच्या दिवशी आम्हाला माहिती असायचं; की आम्ही एक इयत्ता पुढे गेलोय, अभ्यास वाढणार आहे, काठीण्यपातळी वाढणार आहे... पण आम्हाला त्याचं कधीच टेन्शन नसायचं...१५ जून या दिवसामुळेच आम्हाला नव्या आव्हानांची सुरुवात किती सुंदर असू शकते याचा प्र...

प्रिय चॉकलेट...

त्यादिवशी एका मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना 'चॉकलेट कब देगी' असं आपसूकच तोंडातून निघालं... याआधीही अनेकदा 'तुला काय गिफ्ट देऊ' असं कोणी विचारल्यावर 'चॉकलेट द्या' असं मी म्हटलंय (हो अगदी अजूनही म्हणते)...कोणा लहान मुलाच्या हातातलं चॉकलेट पाहून 'काश ये चॉकलेट मेरे हाथ आता' असंही मला या वयातदेखील (माझं वय इतकं पण मोठं नाहीये म्हणा...🙊) वाटून गेलंय...यांसारखे अनेक अनुभव आल्यामुळे मी स्वत:ला 'चॉकलेटप्रेमी' म्हणवते (ये तौफा हमने खुदको दिया है टाईप्स...😂) अर्थात, आसपासच्या शंभर लोकांचा सर्व्हे केला; तर त्यातली कमीतकमी नव्वद लोकं तरी कन्फर्म चॉकलेटवेडी सापडतील... आपल्या आजूबाजूलाच इतकी चॉकलेटवेड्यांची संख्या असल्यामुळे, आपणापैकी अनेकांनी मी वर म्हटलेले अनुभव कधी ना कधीतरी नक्कीच घेतले असतील, आणि स्वत:च स्वत:ला 'चॉकलेटप्रेमी' हा किताबही दिला असेल... नाईंटीज किड्स असोत, वा इतर कोणीही.. सर्वांचं लहानपणापासूनचं पहिलं प्रेम म्हणजे चॉकलेट असतं...आणि आम्हा नाईंटीज किड्स नी तर जुन्या कव्हरातल्या कॉफीबाईट किंवा पांढऱ्या कव्हरातल्या रावळगाव पास...

आमचं वेगळं असतं.....

त्यादिवशी सगळं काम आटपून लॉगआउट केलंच होतं, आणि तेव्हाच माझ्या एका ज्युनियर मैत्रीणीचा मेसेज आला... 'यार, सबमिशन, व्हायवा, प्रॅक्स, परीक्षा सगळंच जवळ आलंय... कधीकधी अभ्यास करावासा वाटतो, पण आपण इंजिनिअर्स असल्यामुळे आपल्याला सिरीयसनेस आदल्या दिवशीच येणार ना...' तिच्याशी या विषयावर बोलता बोलता कोणताही इंजिनिअरिंगचा विद्यार्थी टाईम ट्रॅव्हल करून, एप्रिल-मे महिन्यात गेला नसता तर नवलच होतं...(एप्रिल, मे का म्हटलंय,ते पुढे लक्षात येईलच...)  इंजिनिअरिंग ला ॲडमिशन घ्यायची म्हटल्यावर 'आज कुछ तुफानी करते है' असं म्हणत मुलं उत्साहात इंजिनिअरिंग घेतात आणि मग पुढची (कमीतकमी चार) वर्षं इंजिनिअरिंग त्यांची घेतं', 'इंजिनिअरिंग च्या मुलांचं सगळंच वेगळं, अगदी विषयांपासून ते पेपर पॅटर्न पर्यंत...' ही वाक्यं अनेकदा ऐकली होती... पण ऐकणं आणि अनुभवणं यात खूप फरक असतो असं म्हणतात. त्यामुळे आधी साधी वाटणारी ही वाक्यं किती रिअल आहेत हे चार वर्षांत आम्हा इंजिनिअर्सना वेळोवेळी अगदी प्रकर्षाने जाणवलं.. आणि आता इंजिनिअरिंग संपलं असलं, तरीही आजही ती वाक्यं किती रिअल आहेत हे जाणवतं... इंज...

आठवणीतले मार्च-एप्रिल...

'कुछ बाते हमारे यादों के कमरे की इतनी खिडकिया खोल देती है, की हम दंग रह जाते है!' ये जवानी है दिवानी मधलं हे वाक्य आपल्या सर्वांना, विशेषत: नाइंटीज किड्सना रिलेटेबल वाटतं. काही गोष्टी आता अनुभवायला मिळत नसल्या, तरीही एका ठराविक वेळी मात्र त्या गोष्टींची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मार्च-एप्रिल महिने त्यांपैकीच एक. होतं काय, की मार्च, एप्रिल महिने उजाडले, की सगळीकडे परीक्षामय वातावरण दिसून येतं, आणि आठवते ती शाळेतली वार्षिक परीक्षा.  'परीक्षा' हा तमाम विद्यार्थ्यांच्या डोक्याला शॉट लावणारा शब्द. शाळेत असताना परीक्षेचे दिवस आले, की मस्त सुरु असलेल्या लाईफ मध्ये अचानक कोणीतरी ब्रेक मारलाय असं वाटायचं. शाळेत असताना, कॉलेजमध्ये जास्त परीक्षा घेत नाहीत, सहामाही, वार्षिक असं काहीच नसतं असा आम्हा सर्वांचाच समज होता. त्यामुळे मग उगाचच आजूबाजूला असलेल्या कॉलेज गोइंग मुलांचा हेवा वाटायचा. अर्थात कॉलेजला गेल्यावर तो समज इतका खोडून निघाला की, 'यार शाळेत असताना किती मस्त होतं ना' असं वाटायला लागलं तो भाग वेगळाच.  तर नेहमीप्रमाणेच मार्च, एप्रिल म्हटला की सगळीकडे परीक्षांच्या चर...

#इंजिनिअर्सचा व्हॅलेंटाइन्स

आज व्हॅलेंटाईन्स डे, अर्थात प्रेमाचा दिवस... अशावेळी 'सिंगल लोकं आम्ही', '#प्यारएकधोकाहै' असं म्हणणारी अनेकजण आहेत. पण 'असायनमेंट्स हेच आमचं एकमेव प्रेम' असं म्हणत व्हॅलेंटाईन्स डे ला वेगळाच अर्थ देणारी जमात म्हणजे 'इंजिनिअर्सची😂' आता हे वाचून कहना क्या चाहते हो भाई? असं वगैरे तुमचं झालं असेल, तर मी एक वैतागलेला इंजिनिअर असायनमेंट जरा वेळासाठी बाजूला ठेवून तुम्हाला सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो... तर, असायनमेंट ही गोष्ट पहिल्या इयर ला आमच्यावर लादली जाते, आणि हळूहळू आम्ही एकमेकांशी जरा जास्तच ॲटॅच होत जातो.😂. नंतर आम्ही नकळत तिच्यासाठी झोप, सण, लग्नसमारंभ😂 सगळं काही सॅक्रिफाईज करायला लागतो, आणि कळतं आता चार वर्ष आपलं प्रेम म्हणजे आपल्या असायनमेंट्स😂 नाही, म्हणजे मार्क्स मिळविण्यासाठी असायनमेंट्स आहेत असं युनिवर्सिटीवाले म्हणतात, पण शेवटी मार्क्स देताना आमची तोंडं (आणि ऑनलाईन कॉलेजमध्ये नावंच) पाहिली जातात (#अजीब दोगलापन है😂🙊), बरं असायनमेंट कोणाची तरी बघून लिहिल्यामुळे अभ्यास व्हायचा प्रश्नच नाही, पण तरीही आम्ही असायनमेंट्स लिहितो😂🤦🏻‍♀ क...

आठवणीतला प्रजासत्ताक दिन...

जानेवारी महिना सुरु झाला आणि वार्षिक स्नेहसंमेलन वगैरे सगळे कार्यक्रम झाले, की आम्ही सर्वजण २६ जानेवारी कधी येतोय याची वाट बघत असायचो. यामागे अनेक कारणं होती... पहिलं कारण म्हणजे आमच्या शाळेत नेहमी अतिशय उत्साहाने साजरे होणारे १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे दिवस, आणि त्यासाठी काही दिवस आधीपासून सुरु होणारी तयारी, आमच्या शाळेच्या भव्य ग्राऊंडवर होणारी लेझिम प्रॅक्टिस... देशभक्तीपर गाण्यांची प्रॅक्टिस, या दोनही दिवशी आजी-माजी विद्यार्थ्यांनी भरून जाणारं आमच्या शाळेचं ग्राऊंड, प्रमुख पाहुण्यांची अर्थपूर्ण भाषणं आणि खूप काही... या दोनही दिवशी महिने आणि ऋतू वेगळे असले, तरी आम्हा सर्वांच्या उत्साहाची लेव्हल मात्र सारखीच असायची. २६ जानेवारीच्या निमित्ताने शाळेतल्या प्रजासत्ताक दिनाची, त्यासाठी काही दिवस आधीपासून केलेल्या तयारीची आठवण झाल्याशिवाय रहात नाही... वार्षिक स्नेहसंमेलन झालं, की काही दिवसांनी शाळेत प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरु व्हायची... मग भाषणं करणारे, लेझिमसाठी, देशभक्तीपर गाण्यासाठी कोण कोण इच्छूक आहेत त्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन लगेचच आमच्या प्रॅक्टिसला सुरुवात व्हायची. प्रॅक्टिस क...

रिझॉल्यूशन: मिशन वेटलॉस...

माझी एक जुनी सवय आहे. जुनं वर्ष संपून नवीन वर्ष लागणार असं जेव्हा जाणवतं, तेव्हा अचानक 'आपणसुद्धा नव्या वर्षात नवं काहीतरी करूया' असा विचार करून न्यू इयर रिझॉल्यूशन, अर्थात नवीन वर्षात नवीन संकल्प करण्याचं खूळ माझ्या डोक्यात शिरतं. पण, यातसुद्धा एक झोल आहे.. एकतर मला तारखा लक्षात रहात नाहीत.. म्हणजे 'आज कोणती तारीख आहे' असं जर कोणी मला विचारलं, तर व्हायवा मध्ये एक्स्टर्नलने कठीण प्रश्न विचारल्यावर जसं गोंधळून जायला व्हायचं, अगदी त्यापेक्षा जास्त गोंधळून 'थांबा, मी लॅपटॉप वर चेक करते' असं मी म्हणते... (थॅंक्स टू वर्क फ्रॉम होम...🙈)... तर, सांगायचा मुद्दा इतकाच होता, की (इंजिनिअरिंग करताना एक लहानसा मुद्दा डोक्यात असला तरी तो वाढवून पानभर उत्तर लिहायची सवय असल्यामुळे मुळ मुद्द्यावर यायला आजकाल जरा जास्त वेळ लागतो...😜) तारखा लक्षात रहात नसल्याने नवीन वर्षाच्या कॅलेंडर ची खरेदी झाली, की 'ओके म्हणजे इयर एंडींग जवळ आलंय' हे माझ्या लक्षात येतं... यावर्षीसुद्धा तसंच झालं. नवीन वर्षाचं कॅलेंडर वगैरे आलं, आणि नवीन वर्षाचं रिझॉल्यूशन करूया असं खूळ सालाबादप्रमाणे ...

प्रिय २०२१...

 प्रिय २०२१, उद्या तुझा शेवटचा दिवस... उद्या तू संपणार, तुझं कॅलेंडरही बदललं जाणार... नवीन वर्ष आलं, तरी सुरुवातीचे काही दिवस तरी चुकून तुझी आठवण काढली जाईलच म्हणा... इतके दिवस तारीख लिहिताना २०२१ लिहायची इतकी सवय झालीये ना, की नवीन वर्षाच्या सुरुवातीचे थोडे दिवस तरी तारीख लिहिताना लोचा होईलच... पण ऑफिशियली मात्र तू यापूढे नसणार... खरं सांगायचं, तर नवीन वर्षाकडून भरभरून अपेक्षा ठेवायची आता जरा भीतीच वाटते (याचं कारण तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये...) पण तरीही २०२० संपताना आम्ही तुझ्याकडून अपेक्षा ठेवल्या... खूप अपेक्षा... अगदी करोडो लोकांच्या अपेक्षा होत्या तुझ्याकडून... दहावीच्या वर्षात एखाद्या स्कॉलर विद्यार्थ्याकडून ठेवाव्यात त्यापेक्षाही जास्त... २०२० खूपच आव्हानात्मक गेल्यामुळे तुझ्याकडून अपेक्षा ठेवणं अगदी चूकीचंही नव्हतं, त्यामुळे त्या आपसूकच ठेवल्या गेल्या... एखाद्या हुशार विद्यार्थ्याकडून इतक्या अपेक्षा ठेवल्या तर तो विद्यार्थीही घाबरून जाईल... पण तू मात्र करोडो लोकांच्या अपेक्षा काही प्रमाणात का होईना, पूर्ण केल्यास... तुझ्या सुरुवातीचा काळ नक्कीच अवघड होता, तणावदायक होता....

# इडी स्ट्रगल

इंजिनिअरिंग करताना विद्यार्थ्यांसमोर अनेक आव्हानं येतात. यातलंच एक आव्हान म्हणजे 'इसमे पक्का केटी' विषयांचं. प्रत्येक इंजिनिअरला या कमीतकमी चार वर्षांतील अभ्यासक्रमात एक तरी विषय असा येतो, जो काही केल्या जमत नाही, आणि तो शिकताना 'इसमे पक्का केटी है' या वाक्याचा जप अनेकदा केला जातो. मेकॅनिक्स, एम थ्री अशा अनेक रुपांमध्ये हे विषय इंजिनिअर्सना एकदा तरी भेटतात. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर असा विषय होता 'ईडी, अर्थात इंजिनिअरिंग ड्रॉइंग'... पहिल्या सेम मध्ये मेकॅनिक्स सारख्या विषयाचा सामना करून आमची दुसरी सेम सुरु झाली, आणि या सेमिस्टरमध्ये 'इंजिनिअरिंग ड्रॉइंग' आहे हे लक्षात आल्यावर 'ही सेमिस्टर चिल मध्ये जाणार नाही' हे मला कळून चुकलं. मुळात अगदी शाळेत असल्यापासून माझा आणि चित्रकलेचा ३६ नाही... ३६० चा आकडा होता. एकाजागी बसून चित्र काढणं, कलर करणं मला कधीच जमलं नाही.. त्यामुळे या सेम ला इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे हे कळल्यावर ही सेमिस्टर कशी जाणार आहे याचा मी आधीच अंदाज बांधला होता. शेवटी इडीचं पहिलं लेक्चर सुरु झालं आणि त्यात फर्स्ट ॲन्गल मेथड पासून थर...

प्रिय जूनी गाणी...♥️

 प्रिय जुनी गाणी, खरंतर तुमच्याबद्दल आमच्या मनात असलेलं प्रेम फक्त 'प्रिय' या शब्दात मावणारं नाहीये. 'अतिप्रिय' या शब्दाचीसुद्धा इंग्रजीमध्ये असते ना, तशी एखादी सुपरलेटिव डिग्री असावी, असं वारंवार वाटतं आम्हाला तुमच्याबद्दल व्यक्त होताना, तुमची स्तुती करताना... अगदी 'अतिप्रिय' हा शब्द आणि 'खूप प्रेम' हा हॅशटॅग सुद्धा कमी पडेल इतकं प्रेम आहे आमच्या मनात तुमच्याबद्दल. कोणतीही जागा असो, कोणतीही व्यक्ती समोर असो, तुमचा विषय निघाला, की आम्ही नेहमीच भरभरून बोलतो, पण या भरभरून बोलण्याच्या नादात कधीतरी 'खास तुमच्यासाठी काहीतरी लिहावं' असं वाटलंच नाही आम्हाला. अर्थात तुमच्यासाठी काहीतरी लिहायचं म्हटलं, तर किती आणि काय काय लिहू असंच होईल आम्हा नाईन्टीज किड्सना, पण आज डायरेक्ट तुम्हालाच आणि तुमच्यासाठी काहीतरी लिहावं असं ठरवलंय, आणि लिहायला बसलोय... अर्थात एक गोष्ट नक्की आहे की आम्ही काही 'तुमच्यात असलेल्या प्रत्येक शब्दाइतकं, अर्थात तुमच्या लिरिक्स इतकं सुंदर' लिहू शकत नाही, पण खास तुमच्यासाठी असं छान काहीतरी लिहायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय... नेमक...

टी तिथे आम्ही...

'चहा' म्हटलं, की 'आहा' असा उद्गार आपसूकच कोणाच्याही तोंडून बाहेर पडतो. मी स्वत: चहाप्रेमी नसले, (एक मिनिट... तुम्ही याचा अर्थ मी कॉफी किंवा सरबतप्रेमी वगैरे आहे असा घेऊ नका... कारण मला त्या गोष्टीही फारशा आवडत नाहीत...), तरीही माझे अनेक मित्रमैत्रिणी, आणि ओळखीचे खूप लोकं चहाप्रेमी असल्यामुळे आजची पोस्ट जगातल्या सर्व चहाप्रेमींसाठी... 'चहा' हा शब्द उच्चारला की 'यहा हम पिघल गये' असं अनेकांचं होतं...हे चहाप्रेमी बी पॉजिटीव नाही, तर टी पॉजिटिव असतात. मोबाईलमध्ये कसं, काहीही झालं तरी 'प्लेन मोड वर टाक आणि काढ' हे जागतिक सोल्यूशन असतं, अगदी तसंच कोणतीही समस्या असली किंवा टेन्शन असलं, तरीही 'एक कप चहा' हे सगळ्या चहाप्रेमींचं परमनन्ट सोल्यूशन असतं... मी हे इतक्या ठामपणे लिहितेय, कारण माझ्या ओळखीत अनेकजण चहाप्रेमी आहेत, आणि 'चहा हे पूर्णब्रम्ह' असं मानणारे बरेचजण तुमच्याही ग्रूपमध्ये असतील याची मला पूर्णपणे खात्री आहे... चहाप्रेमींचं चहा हे 'परमनंट पहिलं प्रेम' असतं... ( नाही, म्हणजे मला माहितीये की ही ओळ वाचून चहा आणि पहिलं प्रेम ...

इंट्रोड्यूस युअरसेल्फ...

'इंट्रोड्यूस युअरसेल्फ' हा प्रश्न आपण सर्वांनी कुठे ना कुठेतरी ऐकला असेलच... प्रश्न ऐकायला अगदी सोपा वाटला, तरी या प्रश्नाचं उत्तर देताना तुलनेने जास्त दडपण येतं (हा माझा अनुभव)... माझ्या ब्लॉगवरची ही पहिलीवहिली पोस्ट लिहितानासुद्धा तितकंच दडपण आलंय, कारण ही पहिलीवहिली पोस्ट ब्लॉगची ओळख, अर्थात इंट्रोडक्शन आहे...  खरंतर लहानपणापासूनच मला लिखाणाची आवड होती (पण लिखाणाची आवड आहे वगैरे जाणवण्याचं ते वय नव्हतं...) शाळेत एखादी निबंधस्पर्धा असो, वा मराठी, हिंदी किंवा इंग्रजीचा निबंध लिहायचा असो, कधीच गाईडची मदत घ्यावीशी वाटली नाही... निबंध लिहिताना 'लिख हम रहे है, लेकिन शब्द गाईड के है' असं माझ्याबाबतीत कधी झालं नसल्यामुळे एकदम भारी वाटायचं... हळूहळू वय वाढत गेलं, तसंतसं जाणवत गेलं की 'यार आपल्यालासुद्धा काहीतरी सूचतंय...' आणि मग मीच म्हटलं, 'जर यालाच लिखाणाची आवड म्हणत असतील, तर ठिक आहे आपल्यालाही आहे लिखाणाची आवड...'  पुढे इंजिनिअरिंग करतानासुद्धा लिखाणाची आवड कायम राहिली... ब्लॉग सुरु करावा असं मनापासून वाटत होतं, माझ्या एका मैत्रीणीनेसुद्धा अनेक दिवसांपासून...