आठवणीतला प्रजासत्ताक दिन...
जानेवारी महिना सुरु झाला आणि वार्षिक स्नेहसंमेलन वगैरे सगळे कार्यक्रम झाले, की आम्ही सर्वजण २६ जानेवारी कधी येतोय याची वाट बघत असायचो. यामागे अनेक कारणं होती... पहिलं कारण म्हणजे आमच्या शाळेत नेहमी अतिशय उत्साहाने साजरे होणारे १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे दिवस, आणि त्यासाठी काही दिवस आधीपासून सुरु होणारी तयारी, आमच्या शाळेच्या भव्य ग्राऊंडवर होणारी लेझिम प्रॅक्टिस... देशभक्तीपर गाण्यांची प्रॅक्टिस, या दोनही दिवशी आजी-माजी विद्यार्थ्यांनी भरून जाणारं आमच्या शाळेचं ग्राऊंड, प्रमुख पाहुण्यांची अर्थपूर्ण भाषणं आणि खूप काही... या दोनही दिवशी महिने आणि ऋतू वेगळे असले, तरी आम्हा सर्वांच्या उत्साहाची लेव्हल मात्र सारखीच असायची. २६ जानेवारीच्या निमित्ताने शाळेतल्या प्रजासत्ताक दिनाची, त्यासाठी काही दिवस आधीपासून केलेल्या तयारीची आठवण झाल्याशिवाय रहात नाही... वार्षिक स्नेहसंमेलन झालं, की काही दिवसांनी शाळेत प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरु व्हायची... मग भाषणं करणारे, लेझिमसाठी, देशभक्तीपर गाण्यासाठी कोण कोण इच्छूक आहेत त्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन लगेचच आमच्या प्रॅक्टिसला सुरुवात व्हायची. प्रॅक्टिस क...