Posts

Showing posts from June, 2024

१५ जून...♥️

काही तारखा कितीही वर्ष उलटून गेली तरीही कायम लक्षात असतात... त्यातलीच एक तारीख म्हणजे १५ जून... १५ जून म्हटलं, की कुठेही असलो तरीही आठवतो तो मातीचा सुवास, पाऊस असला तरीही 'आज अनेक दिवसांनी मित्रमैत्रीणी भेटणार' हा उत्साह... छत्री, दप्तर, वह्या सगळ्या गोष्टी नवीन... वह्या-पुस्तकं भिजू नये म्हणून काळजीपूर्वक घातलेली प्लॅस्टिकची पिशवी... आणि भर पावसात छत्री किंवा रेनकोट घालून न कंटाळता शाळेत जाणारे आपण, कारण १५ जून म्हणजे शाळेचा पहिला दिवस... आणि शाळेचा पहिला दिवस म्हणजे १५ जून हे समीकरण ठरलेलं... वार्षिक परीक्षा संपायची आणि एक मे ला निकाल लागायचे... निकाल हातात मिळाले की पास/नापास हा शेरा बघेपर्यंत 'पुढील शैक्षणिक वर्ष १५ जून रोजी सुरु होईल' ही सूचना मिळायची...निकालावर देखील तेच लिहिलेलं असायचं... 'त्यात इतकी सूचना वगैरे द्यायची काय गरज? सगळ्यांना माहितीये की १५ जून लाच शाळा सुरु होते' असं आम्ही गंमतीने म्हणायचो😂 कारण '१५ जून म्हणजे शाळेचा पहिला दिवस' हे आमच्यासाठी वैश्विक सत्य होतं...  कधीतरी १५ जून ला रविवार यायचा आणि मग शाळा १६ जून ला सुरु व्हायची तो भ...