Posts

Showing posts from February, 2024

व्हॅलेंटाईन्स म्हणजे नक्की काय...?

आज व्हॅलेंटाईन्स डे... अनेकजण व्हॅलेंटाईन्स डे ही आपली संस्कृती नाही वगैरे म्हणतात... पण एक दिवस 'थोडीशी गंमत' असं म्हणून व्हॅलेंटाईन्स डे साजरा करायला काही हरकत नाही... खरं तर प्रत्येक दिवस हा 'व्हॅलेंटाईन्स डे' म्हणून अगदी declare  झाला नसला, तरीही काही लहानशा गोष्टी म्हणजेच 'व्हॅलेंटाईन्स' हे नक्की ...व्हॅलेंटाईन्स म्हणजे नक्की काय? तुम्ही पार्टनरसंदर्भात लहान लहान गोष्टी लक्षात ठेवणं हा व्हॅलेंटाईन्स... तुम्ही पार्टनरची अगदी लहानसहान गोष्टींत काळजी घेणं हा व्हॅलेंटाईन्स... तुम्ही पार्टनरच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन स्वत:ला आवडत नसतानाही त्या गोष्टी करायला लागता तो व्हॅंलेंटाईन्स... पार्टनरचे मित्रमैत्रीणी, कुटुंबिय तुम्हाला आपलेसे वाटायला लागतात आणि त्यांच्यात तुम्ही पार्टनरपेक्षाही जास्त मिसळून जाता तो व्हॅलेंटाईन्स... कितीही बिझी असाल तरीही पार्टनरशी बोलण्यासाठी एक मिनिटं तरी वेळ काढता तो व्हॅलेंटाईन्स... पार्टनरला स्पेशल फील कसं होईल यासाठी अगदी लहानसहान गोष्टी करता तो व्हॅलेंटाईन्स... 'जेवलीस का, काय करतेस' या गोष्टी कितीही cringe वाटल्या तरी तुम्ह...

मुंबई लोकल, मेरी जान

लहानपणापासून आपली काहीतरी फॅंटसी असते. कुठेही जायचं म्हटलं की 'तिकडे कसं जायचं' या प्रश्नावर रिक्षा किंवा बस वगैरे च्या फंदात न पडता 'लोकलने जाऊया' असं म्हणत घरच्यांचं शिक्कमोर्तब होत असल्यामुळे लोकलचा आणि माझा संबंध अगदी लहानपणपासूनचा (टेक्निकली स्पिकींग जेव्हा पिवळ्या रंगाची तिकीट्स मिळायची तेव्हापासूनचा🤣). पुढे अकरावी बारावीला अंधेरीपर्यत कॉलेज, इंजिनिअरिंग ला असतानासुद्धा कॉलेज वसईपर्यंत असल्यामुळे 'लोकल आणि मी' हा संबंध कधीही सुटला नाही. कॉलेजला येताजाता प्रत्येक वेळी लोकल मध्ये आमच्यापेक्षा थोड्याशा मोठ्या मुली, महिला मॅचिंग पर्स, हातात फोन, कानात इअरफोन्स  घेऊन वगैरे दिसल्या की 'या ऑफिसला चालल्या आहेत' हे लगेच कळायचं आणि वाटायचं यांचं लाईफ किती छान आहे (ऑफिसला जाणाऱ्या त्या मुलींपेक्षा खरं तर कॉलेजला जाणाऱ्या माझं लाईफच सगक्यात बेस्ट होतं, पण हे realize होण्याइतकं वय तेव्हा नव्हतं). 'एक दिवस आपण पण नोकरीला लागलो की असंच ट्रेनमधून स्टाईलमध्ये प्रवास करूया, ट्रेनमध्ये कोणी काही विकायला आलं की आपल्या स्वत:च्या कमाईतून सगळ्या गोष्टी विकत घेऊया...