Posts

Showing posts from July, 2022

प्रिय तारक मेहता का उल्टा चश्मा❤️

 प्रिय तारक मेहता का उल्टा चश्मा, आपली ओळख खूप वर्षांपूर्वीची... अगदी लहानपणापासून तुला बघत आले असल्यामुळे आपली फ्रेंडशीप तर खास आहेच, पण माझ्या मित्रमैत्रीणींपैकीदेखील अनेकजण तुझे जबरी फॅन्स आहेत, त्यामुळे आम्ही कधीही गप्पा मारत असलो, तरी तुझा विषय हमखास निघतोच... अर्थात, हे मी तुला सांगण्याची गरजच नाही, कारण तुझा फॅनबेस किती मोठा आहे हे तुला माहिती आहेच...  तर, आज तुझा चौदावा वाढदिवस. बरोबर चौदा वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी टीव्हीवर तुझा पहिला एपिसोड प्रसारीत झाला. खरंतर तेव्हा कोणालाच वाटलं नसेल की एके दिवशी हिच सिरीयल सगळे रेकॉर्ड्स ब्रेक करेल, अगदी आम्हा प्रेक्षकांनासुद्धा... पण काही गोष्टी निर्माण होतात त्याच मुळी रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी, आणि त्यातलीच एक गोष्ट म्हणजे तू... तसं बघायला गेलं, तर तू आम्हा फॅन्सना नेहमीच भेटत असतोस...तुला बघायची अशी खास वेळ आम्हाला कोणालाच माहिती नाहीये, कारण जेव्हा जेव्हा चॅनल लावू, तेव्हा तेव्हा तिकडे तूच सुरू असतोस... शनिवार रविवारी तर हमखासच... त्यामुळे भेट म्हणशील तर ती आपली रोजच होत असते... आता मी हे लिहायला बसलेय ना, तेव्हासुद्धा टीव्ही...