प्रिय २०२१...

 प्रिय २०२१,

उद्या तुझा शेवटचा दिवस... उद्या तू संपणार, तुझं कॅलेंडरही बदललं जाणार... नवीन वर्ष आलं, तरी सुरुवातीचे काही दिवस तरी चुकून तुझी आठवण काढली जाईलच म्हणा... इतके दिवस तारीख लिहिताना २०२१ लिहायची इतकी सवय झालीये ना, की नवीन वर्षाच्या सुरुवातीचे थोडे दिवस तरी तारीख लिहिताना लोचा होईलच... पण ऑफिशियली मात्र तू यापूढे नसणार...

खरं सांगायचं, तर नवीन वर्षाकडून भरभरून अपेक्षा ठेवायची आता जरा भीतीच वाटते (याचं कारण तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये...) पण तरीही २०२० संपताना आम्ही तुझ्याकडून अपेक्षा ठेवल्या... खूप अपेक्षा... अगदी करोडो लोकांच्या अपेक्षा होत्या तुझ्याकडून... दहावीच्या वर्षात एखाद्या स्कॉलर विद्यार्थ्याकडून ठेवाव्यात त्यापेक्षाही जास्त... २०२० खूपच आव्हानात्मक गेल्यामुळे तुझ्याकडून अपेक्षा ठेवणं अगदी चूकीचंही नव्हतं, त्यामुळे त्या आपसूकच ठेवल्या गेल्या...

एखाद्या हुशार विद्यार्थ्याकडून इतक्या अपेक्षा ठेवल्या तर तो विद्यार्थीही घाबरून जाईल... पण तू मात्र करोडो लोकांच्या अपेक्षा काही प्रमाणात का होईना, पूर्ण केल्यास... तुझ्या सुरुवातीचा काळ नक्कीच अवघड होता, तणावदायक होता... पण हळूहळू परिस्थिती सुधारत गेली... तू असतानाच वॅक्सिनेशन मोहिम सुरु झाली... करोनाचा प्रभावही तुलनेने कमी झाला... अनेकांची रखडलेली कामं झाली... व्यापार, बिझनेस सुरु झाले... अनेकांना जॉब लागले... मनोरंजन विश्वात सुद्धा अनेक गोष्टी मार्गी लागल्या... जॉइनिंग रखडलेल्यांची  जॉइनिंग्स आली... काहींनी जॉब्स सुद्धा स्विच केले... थोड्या प्रमाणात का होईना, पण शाळा सुरु झाल्या... तू असतानाच खूप काही बदल झाले... बरेचसे बदल सकारात्मकच होते, आहेत...

तुझ्या सुरुवातीला मात्र तू सगळ्यांनाच घाबरवलंस... सुरुवातीचा काळ अनेकांसाठी कठीण होता, तेव्हा 'हे वर्षसुद्धा २०२० सारखं जाणार बहुतेक' असं अनेकांना वाटलं, पण त्यानंतर मात्र तू अनेक सकारात्मक बदल घडवून आणत फिट्टूस करून टाकलीस... 'सगळेच दिवस एकसारखे नसतात,' हे तू आम्हाला प्रकर्षाने जाणवून दिलंस. उद्या तुझा शेवटचा दिवस आहे... २०२१ खूप मोठं वर्ष वाटलं हे खरं असलं, तरीही तुझा शेवटचा दिवस कधी आला ते मात्र कळलंच नाही...

अनेकांच्या अपेक्षा काही प्रमाणात का होईना, पूर्ण करण्यासाठी खूप खूप थॅंक्यू... गेल्या ३६५ दिवसांत आम्ही कधीतरी 'काय यार हे वर्ष पण २०२० सारखंच खराब आहे' असं नक्कीच म्हटलं होतं, सो भूलचूक माफ... सॉरी आणि थॅंक्यू म्हणून फिट्टूस करून टाकूया, आणि पूढच्या प्रवासाला लागूया...

असं म्हणतात, की पूढे चालताना नेहमी मागच्या छान आठवणी लक्षात ठेवायच्या असतात... त्यामुळे  तू दिलेल्या सकारात्मक आठवणींसाठी तुला परत एकदा थॅंक्स म्हणून साईन ऑफ करतोय... 

थॅंक यू सो मच २०२१...


-तुझेच...

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

व्हॅलेंटाईन्स म्हणजे नक्की काय...?

१५ जून...♥️

प्रिय तारक मेहता का उल्टा चश्मा❤️