Posts

प्रिय २०२१...

 प्रिय २०२१, उद्या तुझा शेवटचा दिवस... उद्या तू संपणार, तुझं कॅलेंडरही बदललं जाणार... नवीन वर्ष आलं, तरी सुरुवातीचे काही दिवस तरी चुकून तुझी आठवण काढली जाईलच म्हणा... इतके दिवस तारीख लिहिताना २०२१ लिहायची इतकी सवय झालीये ना, की नवीन वर्षाच्या सुरुवातीचे थोडे दिवस तरी तारीख लिहिताना लोचा होईलच... पण ऑफिशियली मात्र तू यापूढे नसणार... खरं सांगायचं, तर नवीन वर्षाकडून भरभरून अपेक्षा ठेवायची आता जरा भीतीच वाटते (याचं कारण तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये...) पण तरीही २०२० संपताना आम्ही तुझ्याकडून अपेक्षा ठेवल्या... खूप अपेक्षा... अगदी करोडो लोकांच्या अपेक्षा होत्या तुझ्याकडून... दहावीच्या वर्षात एखाद्या स्कॉलर विद्यार्थ्याकडून ठेवाव्यात त्यापेक्षाही जास्त... २०२० खूपच आव्हानात्मक गेल्यामुळे तुझ्याकडून अपेक्षा ठेवणं अगदी चूकीचंही नव्हतं, त्यामुळे त्या आपसूकच ठेवल्या गेल्या... एखाद्या हुशार विद्यार्थ्याकडून इतक्या अपेक्षा ठेवल्या तर तो विद्यार्थीही घाबरून जाईल... पण तू मात्र करोडो लोकांच्या अपेक्षा काही प्रमाणात का होईना, पूर्ण केल्यास... तुझ्या सुरुवातीचा काळ नक्कीच अवघड होता, तणावदायक होता....

# इडी स्ट्रगल

इंजिनिअरिंग करताना विद्यार्थ्यांसमोर अनेक आव्हानं येतात. यातलंच एक आव्हान म्हणजे 'इसमे पक्का केटी' विषयांचं. प्रत्येक इंजिनिअरला या कमीतकमी चार वर्षांतील अभ्यासक्रमात एक तरी विषय असा येतो, जो काही केल्या जमत नाही, आणि तो शिकताना 'इसमे पक्का केटी है' या वाक्याचा जप अनेकदा केला जातो. मेकॅनिक्स, एम थ्री अशा अनेक रुपांमध्ये हे विषय इंजिनिअर्सना एकदा तरी भेटतात. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर असा विषय होता 'ईडी, अर्थात इंजिनिअरिंग ड्रॉइंग'... पहिल्या सेम मध्ये मेकॅनिक्स सारख्या विषयाचा सामना करून आमची दुसरी सेम सुरु झाली, आणि या सेमिस्टरमध्ये 'इंजिनिअरिंग ड्रॉइंग' आहे हे लक्षात आल्यावर 'ही सेमिस्टर चिल मध्ये जाणार नाही' हे मला कळून चुकलं. मुळात अगदी शाळेत असल्यापासून माझा आणि चित्रकलेचा ३६ नाही... ३६० चा आकडा होता. एकाजागी बसून चित्र काढणं, कलर करणं मला कधीच जमलं नाही.. त्यामुळे या सेम ला इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे हे कळल्यावर ही सेमिस्टर कशी जाणार आहे याचा मी आधीच अंदाज बांधला होता. शेवटी इडीचं पहिलं लेक्चर सुरु झालं आणि त्यात फर्स्ट ॲन्गल मेथड पासून थर...

प्रिय जूनी गाणी...♥️

 प्रिय जुनी गाणी, खरंतर तुमच्याबद्दल आमच्या मनात असलेलं प्रेम फक्त 'प्रिय' या शब्दात मावणारं नाहीये. 'अतिप्रिय' या शब्दाचीसुद्धा इंग्रजीमध्ये असते ना, तशी एखादी सुपरलेटिव डिग्री असावी, असं वारंवार वाटतं आम्हाला तुमच्याबद्दल व्यक्त होताना, तुमची स्तुती करताना... अगदी 'अतिप्रिय' हा शब्द आणि 'खूप प्रेम' हा हॅशटॅग सुद्धा कमी पडेल इतकं प्रेम आहे आमच्या मनात तुमच्याबद्दल. कोणतीही जागा असो, कोणतीही व्यक्ती समोर असो, तुमचा विषय निघाला, की आम्ही नेहमीच भरभरून बोलतो, पण या भरभरून बोलण्याच्या नादात कधीतरी 'खास तुमच्यासाठी काहीतरी लिहावं' असं वाटलंच नाही आम्हाला. अर्थात तुमच्यासाठी काहीतरी लिहायचं म्हटलं, तर किती आणि काय काय लिहू असंच होईल आम्हा नाईन्टीज किड्सना, पण आज डायरेक्ट तुम्हालाच आणि तुमच्यासाठी काहीतरी लिहावं असं ठरवलंय, आणि लिहायला बसलोय... अर्थात एक गोष्ट नक्की आहे की आम्ही काही 'तुमच्यात असलेल्या प्रत्येक शब्दाइतकं, अर्थात तुमच्या लिरिक्स इतकं सुंदर' लिहू शकत नाही, पण खास तुमच्यासाठी असं छान काहीतरी लिहायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय... नेमक...

टी तिथे आम्ही...

'चहा' म्हटलं, की 'आहा' असा उद्गार आपसूकच कोणाच्याही तोंडून बाहेर पडतो. मी स्वत: चहाप्रेमी नसले, (एक मिनिट... तुम्ही याचा अर्थ मी कॉफी किंवा सरबतप्रेमी वगैरे आहे असा घेऊ नका... कारण मला त्या गोष्टीही फारशा आवडत नाहीत...), तरीही माझे अनेक मित्रमैत्रिणी, आणि ओळखीचे खूप लोकं चहाप्रेमी असल्यामुळे आजची पोस्ट जगातल्या सर्व चहाप्रेमींसाठी... 'चहा' हा शब्द उच्चारला की 'यहा हम पिघल गये' असं अनेकांचं होतं...हे चहाप्रेमी बी पॉजिटीव नाही, तर टी पॉजिटिव असतात. मोबाईलमध्ये कसं, काहीही झालं तरी 'प्लेन मोड वर टाक आणि काढ' हे जागतिक सोल्यूशन असतं, अगदी तसंच कोणतीही समस्या असली किंवा टेन्शन असलं, तरीही 'एक कप चहा' हे सगळ्या चहाप्रेमींचं परमनन्ट सोल्यूशन असतं... मी हे इतक्या ठामपणे लिहितेय, कारण माझ्या ओळखीत अनेकजण चहाप्रेमी आहेत, आणि 'चहा हे पूर्णब्रम्ह' असं मानणारे बरेचजण तुमच्याही ग्रूपमध्ये असतील याची मला पूर्णपणे खात्री आहे... चहाप्रेमींचं चहा हे 'परमनंट पहिलं प्रेम' असतं... ( नाही, म्हणजे मला माहितीये की ही ओळ वाचून चहा आणि पहिलं प्रेम ...

इंट्रोड्यूस युअरसेल्फ...

'इंट्रोड्यूस युअरसेल्फ' हा प्रश्न आपण सर्वांनी कुठे ना कुठेतरी ऐकला असेलच... प्रश्न ऐकायला अगदी सोपा वाटला, तरी या प्रश्नाचं उत्तर देताना तुलनेने जास्त दडपण येतं (हा माझा अनुभव)... माझ्या ब्लॉगवरची ही पहिलीवहिली पोस्ट लिहितानासुद्धा तितकंच दडपण आलंय, कारण ही पहिलीवहिली पोस्ट ब्लॉगची ओळख, अर्थात इंट्रोडक्शन आहे...  खरंतर लहानपणापासूनच मला लिखाणाची आवड होती (पण लिखाणाची आवड आहे वगैरे जाणवण्याचं ते वय नव्हतं...) शाळेत एखादी निबंधस्पर्धा असो, वा मराठी, हिंदी किंवा इंग्रजीचा निबंध लिहायचा असो, कधीच गाईडची मदत घ्यावीशी वाटली नाही... निबंध लिहिताना 'लिख हम रहे है, लेकिन शब्द गाईड के है' असं माझ्याबाबतीत कधी झालं नसल्यामुळे एकदम भारी वाटायचं... हळूहळू वय वाढत गेलं, तसंतसं जाणवत गेलं की 'यार आपल्यालासुद्धा काहीतरी सूचतंय...' आणि मग मीच म्हटलं, 'जर यालाच लिखाणाची आवड म्हणत असतील, तर ठिक आहे आपल्यालाही आहे लिखाणाची आवड...'  पुढे इंजिनिअरिंग करतानासुद्धा लिखाणाची आवड कायम राहिली... ब्लॉग सुरु करावा असं मनापासून वाटत होतं, माझ्या एका मैत्रीणीनेसुद्धा अनेक दिवसांपासून...