'ॲडल्टिंग' वाढदिवस
त्यादिवशी ऑफिसमध्ये काम करत असताना एक मैत्रीण सांगत होती... 'पुढच्या आठवड्यात माझा वाढदिवस आहे... लिव्ह अप्लाय केली होती; माहिती नव्हतं approve होईल का, पण नशीबाने झाली लिव्ह approve. कॉल वर available असेन मी काही अर्जंट काम असेल तर'
'शक्यतो आम्ही नाही करणार तुला वर्क कॉल्स, its your day, एंजॉय कर' मी म्हणाले.
'अगं birthday ला काय एंजॉय करायचं? जागायचं, डॉट बारा वाजता फ्रेंड्स चे कॉल रिसीव्ह करायचे, केक कापायचा, मेसेज आणि स्टोरीज ना रिपोस्ट करायचं आणि एकदा कॉपी केलेला 'Thanks alot' चा मेसेज सगळ्यांच्या चॅटमध्ये पेस्ट करायचा... त्यात ऑफिस कॉल आला तर संपलंच. क्लायंट त्यांचं काम काढून घेणार आणि नेहमीप्रमाणे 'sorry for disturbing you on birthday' असं म्हणत फेक wish करणार, मग आपणही तसंच फेक हसून त्याना thanks म्हणणार... रात्र झाली की 'Thanks for wishing me and making my day special' ची स्टोरी टाकायची. आता तुच सांग; was that really a special day?' आता वाढदिवस वगैरेचं काही वाटत नाही यार, its just like any other day with just a bit more attention. तुझे पता है, ये सब realise हुआ ना, तब बहोत बुरा लगता था, but its bitter truth, we are in adulting phase now' तिने एका दमात उत्तर दिलं....
या संवादातला प्रत्येक शब्द अगदी रिअल आणि नाइंटीज किड्सना रिलेट करेल असाच होता... त्यामुळे तिच्या या बोलण्यावर रिप्लाय करायला मला शब्दच सुचेनात... मी फक्त हसले, पण मला ये जवानी है दिवानी मधल्या अदितीचं वाक्य राहूनराहून आठवलं... 'कितने जल्दी बडे होगये ना हम?'
खरोखर, खूप पटापट मोठे झालो आपण सगळे...या सगळ्या विचारांत पटकन लहानपणीचे दिवस आठवले... लहानपणी 'कधी एकदा वाढदिवस येतोय' असं वाटायचं... वाढदिवस ज्या महिन्यात आहे तो महिना सुरु झाला, की वाढदिवसाचं काउंटडाऊन सुरु व्हायचं... अगदी 'वर्गात वाटायला चॉकलेट्स कधी घ्यायची' इथपासून ते 'संध्याकाळी आई काय गोड करेल' इथपर्यंत... वाढदिवस जसजसा जवळ यायचा तसा अजून एका गोष्टीचा आनंद असायचा; तो म्हणजे 'वाढदिवसाला बाकी सगळे युनिफॉर्मवर, पण आपण मात्र आपल्या आवडत्या ड्रेसवर असणार', हा आनंद काही औरच होता... आईबाबांसोबत एखाद्या दुकानात जाऊन आपला आवडता ड्रेस घेणं यात जे काही सुख होतं, ते आजच्या flipkart myntra च्या शॉपिंगमध्ये कुठून येणार?
अखेर वाढदिवसाचा दिवस उजाडायचा... त्यावेळी आजच्यासारखं सोशल मिडीया नसल्यामुळे व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर शेकड्याने पडणारे कोरड्या शुभेच्छांचे मेसेज नसंत... 12 वाजेपर्यंत जागून विश करणं वगैरे हा फंडा तर कधी मनातही आला नाही... स्वत:कडे फोन नसल्यामुळे आईबाबांच्या फोनवर नातेवाईक, आजीआजोबा यांचे मनापासून खऱ्याखुऱ्या शुभेच्छांचे फोन यायचे... every wish was pure... शाळेत गेल्यावर वेगळ्या ड्रेसमुळे अगदी सगळ्यांना न सांगताही वाढदिवसाबद्दल कळायचं... मग शाळेतील अगदी ओळखीचे नसलेले सुद्धा शुभेच्छा द्यायचे...वर्गात गेल्यावर मित्रमैत्रीणी शुभेच्छा देण्यासाठी वाट बघत असायचे... पहिल्या तासाला सगळे उभे राहून एका सुरात 'happy birthday to you.. May God bless you' आणि नंतर एकासुरात 123... 123... 1,2,3... अशा तीनवेळा टाळ्या (तुम्हा सगळ्यांच्या कानात वाजल्याच असतील😂) वाजवून शुभेच्छा द्यायचे... आजकाल कितीही 'हॅप्पी बर्थ्डे टू यू जी' ची गाणी स्टोरीवर ठेवा, शाळेच्या पहिल्या तासाला आपल्याच मित्रमैत्रीणींनी म्हटलेल्या गाण्याची सर त्याला येऊच शकत नाही... हे सगळं झाल्यावर चॉकलेट वाटण्याचा कार्यक्रम सुरु व्हायचा. मग बेस्टफ्रेंड ला सोबत घेऊन शिक्षकांना आणि पूर्ण वर्गाला चॉकलेट वाटायचं, इतर वर्गांत जाऊन प्रत्येक शिक्षकाला चॉकलेट्स द्यायची आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. सोबत आलेल्या मित्रमैत्रीणीला आणि शिक्षकांना दोन चॉकलेट्स आणि बाकी सगळ्यांना एक चॉकलेट इतकं सोपं distribution होतं... शिक्षक मनापासून आशीर्वाद द्यायचे... शाळेत असताना 'birthday आहे म्हणजे गिफ्ट दिलं पाहिजे' अशा संकल्पना नव्हत्या... अगदी दिलंच तर काही मित्रमैत्रीणी अगदी साधंसोपं ग्रिटींग कार्ड द्यायचे, म्हणजे अगदी चित्रकलेच्या वहीचं पान फाडून त्यावर स्केचपेन ने happy birthday चा मेसेज लिहिलेला असायचा असं ग्रिटींग कार्ड... आता मला सांगा, त्या ग्रिटींगची सर आजकालच्या महागड्या कस्टमाईझ्ड ग्रिटींग कार्ड्समध्ये कशी येईल?
वाढदिवसाच्या दिवशी आणखीन एक फायदा व्हायचा, तो म्हणजे ज्याचा वाढदिवस आहे त्याला एक दिवस सगळ्यात सूट मिळायची... शिक्षक फळ्यावर गणितं सोडवायला बोलवायचे नाहीत, ओरडायचे नाहीत वा 'गृहपाठ झाला का' असंदेखील विचारायचे नाहीत, खूप भारी वाटायचं तेव्हा, अगदी सेलिब्रिटी असल्यासारखं...शिक्षकांच्या आणि मित्रमैत्रीणींच्या त्या प्रेमाची सर आताच्या 'enjoy your day' च्या मेसेजेस मध्ये वा महागड्या गिफ्ट्स मध्ये निश्चितच मिसिंग असते... संध्याकाळी औक्षण, सर्व मित्रमैत्रीणींना घरी जमवून वेफर्स, दोन चॉकलेट्स, आईने केलेला आवडता गोड पदार्थ, आणि पुस्तकात वाचून घरीच केलेला केक असा बेत असायचा... उगीच भारंभार केक आणायचा आणि पूर्ण केक तोंडाला फासून फुकट घालवायचा असे कन्सेप्ट्सच नव्हते तेव्हा... शाळेत असताना आजसारखी हायफाय चॉकलेट्स वगैरे द्यायची पद्धत नव्हती... एखाद्याने मेलोडी किंवा एक्लेअर्स वाटलं तरीही आम्ही 'बडे लोग' अशा नजरेने त्याच्याकडे पहात असू😂... almost सगळेजण मॅंगो बाईट, कच्चा कैरी, अल्पेनलिबी किंवा कॉफीबाईट हिच चॉकलेट्स वाटायचे. आजकाल पहायला गेलं तर प्रत्येक पालक आपल्या मुलामुलींचा वाढदिवस 'बिग बजेट' कसा होईल हे पहात असतात... हायफाय चॉकलेट्स, कार्टून किंवा बारबी केक, पिझ्झा बर्गरची पार्टी, महागड्या गाड्या, खेळणी वगैरे असे रिटर्न गिफ्ट्स (आमच्यावेळी रिटर्न गिफ्ट्स म्हणजे साधंसोपं बोधकथांचं पुस्तक असायचं😂), असो, पण शाळेत असताना आपणा नाइंटीज किड्स चं सगळं छान आणि सोपं होतं हेच खरं....
ही सगळी वाढदिवसाची मजा आठवी नववी पर्यंत... मग दहावीत हळूहळू 'आपण मोठे झालोय आता कुठे चॉकलेट वगैरे वाटत बसायचं, आता कुठे वेगळे कपडे घालायचे' असं वगैरे वाटायला लागलं... त्यात बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास आणि क्लास वगैरे या सगळ्यांत मित्रमैत्रीणींचं घरी येणं पण कमी होत गेलं... कॉलेजला गेल्यावर तर बर्थडे चे कन्सेप्टच बदलले. शाळेतल्या प्रेमळ शिक्षकांची जागा अति strict प्रोफेसर्सनी घेतली होती ज्यांच्या birthday wish मध्ये सुद्धा एक प्रकारचा रुक्षपणा होता, शाळेतल्या शिक्षकांइतकी आपुलकी नाही... शाळेतल्या शिक्षकांसारखं वाढदिवसाला सुट वगैरे देणं कॉलेजमध्ये नव्हतं...वाढदिवसाच्या दिवशीही ओरडा पडायचा... शेवटी शाळेतले शिक्षक ते शाळेतलेच शिक्षक; ज्यांच्या प्रेमाची आणि आपुलकीची जागा कोणीही घेऊ शकत नाही... चॉकलेट्स आणि वेफर्स ची जागा कॅंटीन मध्ये जाऊन दिलेल्या पार्टी ने घेतली होती... केक कापण्यातल्या शिस्तीची जागा बेशिस्तपणे केक तोंडाला फासण्याने घेतली होती... नातेवाईकांच्या कॉल्स ची जागा व्हॉट्सॲप फेसबुक मेसेजेस नी घेतली होती... मित्रमैत्रीणींच्या शाळेत गेल्यावर केलेल्या birthday wish ची जागा बारा वाजेपर्यंत जागून 'डॉट बारा वाजता' पोस्ट केलेल्या स्टोरीजनी घेतली होती... साध्या ग्रीटिंग कार्ड्स ची जागा महागड्या गिफ्ट्स आणि customized ग्रिटींग्स नी घेतली होती... आईबाबांबरोबर एखाद्या साध्या दुकानात जाऊन केलेल्या खरेदीची जागा myntra आणि flipakart ने घेतली होती...
पुढे कॉलेज संपलं आणि नोकरीला लागलो... क्लायंटच्या न संपणाऱ्या डिमांड्स आणि न संपणारं काम याच्या नादात स्वत:साठीच वेळ कमी पडू लागला... शाळा कॉलेज ला असताना वाढदिवसाला 'स्पेशल वाटावं' म्हणून सुट्टी घेणं टाळणारे आम्ही नोकरीला लागल्यावर मात्र वाढदिवसाच्या दिवशी सुट्टी घेऊ लागलो (तिसुधा मिळेलच याचीही खात्री नाही...) सर्वजण आपापल्या नोकरीमध्ये व्यस्त झाल्यामुळे व्हिडिओ कॉल्स, ऑनलाइन गिफ्ट्स आणि स्टोरीज यामार्फत एकमेकांना शुभेच्छा देऊ लागलो... वाढदिवसाच्या दिवशी सुट्टी मिळाली नाही तर काम करताना 'कसला वाढदिवस आणि कसलं काय', प्रोफेसर्सच्या रुक्ष शुभेच्छांची जागा क्लायंट्सच्या टोमण्यांनी घेतलीये... ऑनलाईन शॉपिंग च्या वाढत्या जाळ्यात प्रत्येक महिना काहीतरी खरेदी केली जातेच, त्यामुळे birthday साठी शॉपिंग करण्यात आता पहिल्यासारखी मजा नाही... लहानपणच्या 'आपण एक वर्ष मोठे झालो' या आनंदाची जागा आता मात्र 'हळूहळू आपण मोठे होतोय आणि आपल्याला सेटल व्हायला पाहिजे' या जबाबदारीच्या फिलींग ने घेतलीये, आणि 'adulting birthday' चा अर्थ खऱ्या अर्थाने पटलाय...
तितक्यात फोन वाजला आणि मी भानावर आले, क्लायंट कॉल होता... 'एक मेल भेजा है, Revert it by today EOD'... माझी सगळी विचारर्शृंखला तुटली आणि हे सगळं लिखित स्वरूपात उतरवायचंच असा निश्चय करून मी कामाला लागले, पण 'कितने बडे होगये ना हम' या 'ये जवानी' मधल्या अदितीच्या वाक्याचा अर्थ मनोमन पटला होता...
-केतकी मोडक
गेले काही दिवस कामात व्यस्त असल्यामुळे लिखाणासाठी वेळ काढता आला नाही, पालक, मावशी आणि इतर अनेकांनी 'लिखाण सुरु ठेव गं, काहीतरी लिही ना, ब्लॉग सुरु ठेव' असे प्रेमळ सल्ले दिले आणि मी ठरवलं 'जसा वेळ मिळेल तसा वेळ काढायचा, आणि परत एकदा लिहिणं सुरु ठेवायचं...' तुमच्या प्रेमामुळेच परत एकदा लिखाण सुरु करण्याची प्रेरणा मिळाली.... असेच आशीर्वाद कायम असूद्यात...🙏🤍
Nice 👍🏻
ReplyDeleteछान... लिहित राहा....आणि लग्न जमल्यावर आणि लग्न झाल्यावर निदान काही वर्षे तरी तू वाढदिवसाची आतुरतेने वाट पाहशील... Rather तुम्ही दोघे एकमेकांचे वाढदिवस खूप स्पेशल करा असा माझा तुला सल्ला....तू अजून एव्हढी पण मोठी झालेली नाहीयेस...
ReplyDeleteखर आहे .
DeleteVery good, keep it up
ReplyDelete