#इंजिनिअर्सचा व्हॅलेंटाइन्स

आज व्हॅलेंटाईन्स डे, अर्थात प्रेमाचा दिवस...

अशावेळी 'सिंगल लोकं आम्ही', '#प्यारएकधोकाहै' असं म्हणणारी अनेकजण आहेत. पण 'असायनमेंट्स हेच आमचं एकमेव प्रेम' असं म्हणत व्हॅलेंटाईन्स डे ला वेगळाच अर्थ देणारी जमात म्हणजे 'इंजिनिअर्सची😂' आता हे वाचून कहना क्या चाहते हो भाई? असं वगैरे तुमचं झालं असेल, तर मी एक वैतागलेला इंजिनिअर असायनमेंट जरा वेळासाठी बाजूला ठेवून तुम्हाला सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो...

तर, असायनमेंट ही गोष्ट पहिल्या इयर ला आमच्यावर लादली जाते, आणि हळूहळू आम्ही एकमेकांशी जरा जास्तच ॲटॅच होत जातो.😂. नंतर आम्ही नकळत तिच्यासाठी झोप, सण, लग्नसमारंभ😂 सगळं काही सॅक्रिफाईज करायला लागतो, आणि कळतं आता चार वर्ष आपलं प्रेम म्हणजे आपल्या असायनमेंट्स😂

नाही, म्हणजे मार्क्स मिळविण्यासाठी असायनमेंट्स आहेत असं युनिवर्सिटीवाले म्हणतात, पण शेवटी मार्क्स देताना आमची तोंडं (आणि ऑनलाईन कॉलेजमध्ये नावंच) पाहिली जातात (#अजीब दोगलापन है😂🙊), बरं असायनमेंट कोणाची तरी बघून लिहिल्यामुळे अभ्यास व्हायचा प्रश्नच नाही, पण तरीही आम्ही असायनमेंट्स लिहितो😂🤦🏻‍♀ कारण शास्त्र असतं ना ते!😂

असं म्हणतात ना, प्रेमात पडल्यावर माणूस बदलतो, या असायनमेंट वाल्या प्रेमामुळे आम्ही देखील ४ वर्षांत पुरते बदललोय! म्हणजे १० च्या आत झोपणारा एखादा असायनमेंट साठी १ वाजेपर्यंत जागतो, तर अगदी बारावीपर्यंत सुवाच्च अक्षर काढणारा विद्यार्थी नंतर 'कोंबडीचा पाय' कॅटॅगरीत समाविष्ट होतो. एखादा अभ्यासू विद्यार्थी लेक्चर सुरु असताना असायनमेंट्स लिहायला बसतो. तर जीवनात कधीच खोटं न बोलणारा विद्यार्थी असायनमेंट पूर्ण नाही झाली, तर कॉलेज ऑफलाईन असताना खोटा खोटा आजारी तरी पडायचा, किंवा आता कॉलेज घरीच असल्यामुळे Net Issue होता असं तरी सांगतो (अर्थात खोटं बोलण्याचा हा प्रयत्न बरेचदा 'चुकीला माफी नाही' म्हणून परतवून लावला जातो हा भाग वेगळा😂)

प्रेमात कशी मित्रमैत्रिणी सेंटिंग लावून देतात, तशी सेटिंग इकडेपण लागते बरं का😂! म्हणजे एखादी असायनमेंट आपली पूर्ण नसेल, तर 'अरे टेन्शन कशाला घेतो, याची झालीये कम्प्लिट ती असायनमेंट, याच्याकडून घे' असं म्हणत सेटिंग लावून दिली जाते. मग या सेटिंग लावून दिलेल्या मित्राला धन्यवाद द्यायचे, आणि असायनमेंट पूर्ण करुन टाकायची, झाली की नाही #परफेक्टसेटिंगडजन्टएक्झिस्ट?😂

एखाद्या लव्ह स्टोरीत जसा विलन असतो ना, तसेच आमच्या आणि असायनमेंट च्या लवस्टोरीत विलन बनतात ते आमचे प्रोफेसर्स😂. मग एखादी असायनमेंट मागून 'मी ही असायनमेंट दिलीच नव्हती' असं सांग, एखादी असायनमेंट चुकुन लेट दिलीच, तर 'मै आपको सिंपथी दे सकता हू, एक्स्टेंशन नहीं' असा 'थ्री इडियट्स' मधल्या 'व्हायरस' चा डायलॉग मार, एखादी असायनमेंट त्या विद्यार्थ्यासमोर फाडूनच टाक, एखाद्याची असायनमेंट नजरचुकीने हरवून त्याला परत लिहायला लाव (सध्या ऑनलाईन असल्यामुळे ती फाडण्याचा किंवा हरवण्याचा प्रश्न नाही, पण ऑफलाइन कॉलेज असताना हेही अनुभवलंय), सेम एंड ला सबमिशन accept च करू नको असे अनेक सोहळे 'इतर सर्व प्रोफेसर्सना' साक्षी ठेवून पार पाडले जातात😂 आणि अशावेळी 'हिच आमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे' ही ओळ खरोखरच अगदी दिल से म्हणावीशी वाटते.😂(सध्या काही वेळापासून ऑनलाईन मोड असल्यामुळे इतर प्रोफेसर्सना साक्षी ठेवणं कमी झालंय म्हणा...)

कॉलेज ऑफलाइन असताना आम्ही इंजिनिअर्स, पावसाळ्यात स्वत: भिजायचो, पण असायनमेंट्स ना काहीही होऊ द्यायचो नाही. आपल्या असायनमेंट्स दुसऱ्याला दिल्या, तरी त्या सुखरुप मिळेपर्यंत आम्ही काळजीत असायचो, त्या हरवू नये म्हणून अगदी डोळ्यात तेल घालून असायनमेंट सांभाळायचो... आणि आता काही दिवसांपासून ऑनलाईन कॉलेज असल्यामुळे असायनमेंट्स ची PDF चुकून डिलीट तर होणार नाही ना याची पुरेपूर काळजी घेतो... सो, खऱ्या प्रेमातील पझेसिवनेस इकडेसुद्धा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही😂

त्यामुळे खऱ्या प्रेमाबद्दल विचार केला तर 'यु टॉक अबाऊट रोमिओ ज्युलिएट, बट आय टॉक अबाऊट इंजिनिअर ॲन्ड असायनमेंट्स, वी आरन्ट सेम ब्रो😂' असं निश्चितच म्हणता येईल🙊😜😂

PS: लेख वाचून 'काय तो उगीच साध्या असायनमेंट चा बाऊ करतात' असा विचार मनात आलाच, तर सेमिस्टर बाकी आहे, आमच्या असायनमेंट्स लिहून PDFs पाठवून द्याव्यात😜😂 मंडळ आपलं आभारी राहिल😂🙊

Jokes apart, पण ४ वर्षांत इतक्या असायनमेंट्स लिहिल्यात की वाटतं सगळ्या असायनमेंट्स रद्दी म्हणून दिल्या असत्या, तर एखादी स्कुटी तर नक्कीच विकत घेतली असती😜😂

I Hope आता तुम्हाला सुरुवातीला मी जे म्हटलं ते का म्हटलं हे कळलं असेल.. अजूनही कळलं नसेल, तर मी यापेक्षा जास्त समजवू शकत नाही, खूप असायनमेंट्स लिहायच्या बाकी असल्यामुळे मुझे नहीं लगता मै आपको समझाने में और समय इन्व्हेस्ट कर पाऊंगा, सो आय एम आऊट...🚶🏻‍♂️

तर,

असायनमेंट हेच एकमेव प्रेम असलेल्या इंजिनिअर्सना सुद्धा व्हॅलेंटाईन्स डे च्या शुभेच्छा😂 आणि आर्टिकल आवडलं असेल, तर मला एक दोन असायनमेंट्स लिहून द्या, खूप गरज आहे😂

Comments

  1. Assignment लिहून देतो पण maz अक्षर कोंबडीचे पाय आहे चालेल का ?
    ����


    छान झालाय लेख..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

व्हॅलेंटाईन्स म्हणजे नक्की काय...?

१५ जून...♥️

प्रिय तारक मेहता का उल्टा चश्मा❤️