इंट्रोड्यूस युअरसेल्फ...

'इंट्रोड्यूस युअरसेल्फ' हा प्रश्न आपण सर्वांनी कुठे ना कुठेतरी ऐकला असेलच... प्रश्न ऐकायला अगदी सोपा वाटला, तरी या प्रश्नाचं उत्तर देताना तुलनेने जास्त दडपण येतं (हा माझा अनुभव)... माझ्या ब्लॉगवरची ही पहिलीवहिली पोस्ट लिहितानासुद्धा तितकंच दडपण आलंय, कारण ही पहिलीवहिली पोस्ट ब्लॉगची ओळख, अर्थात इंट्रोडक्शन आहे... 

खरंतर लहानपणापासूनच मला लिखाणाची आवड होती (पण लिखाणाची आवड आहे वगैरे जाणवण्याचं ते वय नव्हतं...) शाळेत एखादी निबंधस्पर्धा असो, वा मराठी, हिंदी किंवा इंग्रजीचा निबंध लिहायचा असो, कधीच गाईडची मदत घ्यावीशी वाटली नाही... निबंध लिहिताना 'लिख हम रहे है, लेकिन शब्द गाईड के है' असं माझ्याबाबतीत कधी झालं नसल्यामुळे एकदम भारी वाटायचं... हळूहळू वय वाढत गेलं, तसंतसं जाणवत गेलं की 'यार आपल्यालासुद्धा काहीतरी सूचतंय...' आणि मग मीच म्हटलं, 'जर यालाच लिखाणाची आवड म्हणत असतील, तर ठिक आहे आपल्यालाही आहे लिखाणाची आवड...' 

पुढे इंजिनिअरिंग करतानासुद्धा लिखाणाची आवड कायम राहिली... ब्लॉग सुरु करावा असं मनापासून वाटत होतं, माझ्या एका मैत्रीणीनेसुद्धा अनेक दिवसांपासून अनेकदा हा सल्ला दिला होता... पण मुहूर्त मात्र मिळत नव्हता... आज दूपारी अचानक मनात विचार आला, किती दिवसांपासून ब्लॉग सुरु करायचं म्हणतेय... 'तू फक्त बोलण्यात पटाईत' असं स्वत:च स्वत:ला म्हटलं, आणि वेळ न दवडता लगेच ब्लॉग उघडला... आधी 'ब्लॉगला नाव काय द्यायचं' हे सूचत नव्हतंच, पण 'ब्लॉगला नाव काय द्यायचं सूचलं नाही म्हणून आज ब्लॉग सुरु करता आला नाही' हे कारण मला नकोय असं स्वत:च स्वत:ला बजावलं, आणि काय मॅजिक... लगेच नाव सूचलं की...(म्हणून म्हणते, कधीतरी स्वत:च स्वत:ला धाक दाखवावा लागतो😜)

'समथिंग मनातलं' या माझ्या ब्लॉगवर मी याआधी लिहिलेले काही लेख, इंजिनिअरिंग मध्ये आलेले भन्नाट अनुभव, यापुढेही थेट मनातून आलेल्या भावना शब्दबद्ध करून ब्लॉगमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत राहिन...

आता ही पोस्ट थांबवते (कारण इंट्रोड्यूस युअरसेल्फ चं उत्तर शक्य तितकं लहानच ठेवावं असं म्हणतात...!)

तुमचे आशीर्वाद पाठीशी असू द्या...

धन्यवाद...

Comments

  1. मस्त मस्त🌹🌹

    ReplyDelete
  2. खूपच छान सुरुवात।।अगदी मनापासून।।गुड लक।।

    ReplyDelete
  3. Nice to see people bloggin in the age of vlogging. Keep it up. Looking forward for more of these.

    ReplyDelete
  4. छान केतकी, शुभेच्छा

    ReplyDelete
  5. Hey, Looking forward to your blogs ♥️ Best wishes 🌻

    ReplyDelete
  6. मस्त लिहिलं आहे .All the best

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

व्हॅलेंटाईन्स म्हणजे नक्की काय...?

१५ जून...♥️

प्रिय तारक मेहता का उल्टा चश्मा❤️