Posts

इंट्रोड्यूस युअरसेल्फ...

'इंट्रोड्यूस युअरसेल्फ' हा प्रश्न आपण सर्वांनी कुठे ना कुठेतरी ऐकला असेलच... प्रश्न ऐकायला अगदी सोपा वाटला, तरी या प्रश्नाचं उत्तर देताना तुलनेने जास्त दडपण येतं (हा माझा अनुभव)... माझ्या ब्लॉगवरची ही पहिलीवहिली पोस्ट लिहितानासुद्धा तितकंच दडपण आलंय, कारण ही पहिलीवहिली पोस्ट ब्लॉगची ओळख, अर्थात इंट्रोडक्शन आहे...  खरंतर लहानपणापासूनच मला लिखाणाची आवड होती (पण लिखाणाची आवड आहे वगैरे जाणवण्याचं ते वय नव्हतं...) शाळेत एखादी निबंधस्पर्धा असो, वा मराठी, हिंदी किंवा इंग्रजीचा निबंध लिहायचा असो, कधीच गाईडची मदत घ्यावीशी वाटली नाही... निबंध लिहिताना 'लिख हम रहे है, लेकिन शब्द गाईड के है' असं माझ्याबाबतीत कधी झालं नसल्यामुळे एकदम भारी वाटायचं... हळूहळू वय वाढत गेलं, तसंतसं जाणवत गेलं की 'यार आपल्यालासुद्धा काहीतरी सूचतंय...' आणि मग मीच म्हटलं, 'जर यालाच लिखाणाची आवड म्हणत असतील, तर ठिक आहे आपल्यालाही आहे लिखाणाची आवड...'  पुढे इंजिनिअरिंग करतानासुद्धा लिखाणाची आवड कायम राहिली... ब्लॉग सुरु करावा असं मनापासून वाटत होतं, माझ्या एका मैत्रीणीनेसुद्धा अनेक दिवसांपासून...